चक्का जाम 🚫चक्का जाम...
31 जाने 2017
🔴🚫🚆🚍🚛🚕🚫🔴
🚫 गल्ली ,गाव, तालुका ,शहर बंद म्हणजे बंद 🚫
उठा, मरगळ झटकून कामाला लागुया राज्यवापी रास्ता रोको आंदोलनाला,
शांततेत मुकमोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाला वाटाण्याच्या अक्षता दाखवणाऱ्या षंढ सरकारचा निषेध करण्यासाठी...
खेळण्या बागडण्याच्या कोवळ्या वयात वासनांध नराधमांची बळी ठरलेल्या श्रद्धाची आर्त किंकाळी वाया जाऊ देऊ नका..
मित्रांनो, जेव्हा मागून मिळत नाही तेव्हा हिसकावून घेण्याची धमक आमच्यात आहे, हा संदेश आता सरकारपर्यंत जायलाच हवा..
आपली लढाई न्यायासाठी आहे, हक्कांसाठी आहे... त्यासाठी लढावंच लागेल... न्यायासाठी कोर्टात आणि हक्कांसाठी रस्त्यावर....
इतके मोर्चे काढून पण सरकारला जाग येणार नसेल तर आता आरपारच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरू या... सर्व ताकती निशी स्वतःला या आंदोलनात झोकून देण्यासाठी सज्ज व्हा..
हा "चक्काजाम" चा लढा इतका परीणाम कारक होऊ द्या की नंतरच्या मुंबई मोर्चाची गरजच उरणार नाही....
_दि. 31 जानेवारी रोजी होणाऱ्या चक्का जाम आंदोलनासाठीची राज्यस्तरीय आचारसंहिता_
1. चक्काजाम आंदोलन हे सकाळी ठीक 11.00 वा. सुरु होईल व दुपारी 01.00 वा.राष्ट्रगीताने संपेल.
2.कोणत्याही परिस्थित शासकीय किंवा खाजगी वाहनांची हवा सोडणे, तोड़फोड़ करणे किंवा समाजाच्या प्रतिष्ठेला काळीमा फासणारे कोणतेही कृत्य करू नये आणि जर असे प्रकार करताना कोणी आढळले तर त्यांना रोखावे.
3.पोलिस अधिकारी किंवा कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याशी अरेरावीची भाषा करू नये व जर अधिकारी आपल्यासोबत असे वर्तन करत असतील तर त्याचे चित्रीकरण आजुबाजूवाल्यांनी करुण ठेवावे जेनेकरुण तो भविष्यात आपल्यासाठी पुरावा ठरू शकतो.
4.आंदोलन सुरु असताना जर रुग्नवाहिका, अग्निशामक दल व अत्यावश्यक वाहने आली तर त्यांना तत्काळ रस्ता करुण द्यावा.
5.आंदोलन हे कुठल्याही पक्षाच्या, नेत्यांच्या, जाती-धर्माच्या विरोधात नसल्यामुळे कुणाच्या विरोधात घोषणाबाजी करु नये.
6.आंदोलनादरम्यान जर प्रवासी वाहतूक करणारी वाहने अड़कलेली असतील तर त्यातील प्रवाश्यांणा शक्य ती मदत करावी.(उदा.पाणी वाटप)
7.मराठा समाजाने मराठा क्रांतिमोर्चाच्या माध्यमातून जगाला जो शांतपणे मोर्चा किंवा आंदोलन करण्याचा संदेश दिला त्याचप्रमाणे हे चक्काजाम आंदोलनही शांतपणे पार पडावे याची समाजबांधवांनी काळजी घ्यावी.
सदरील आचारसंहिता मराठा क्रांतिमोर्चा राज्यव्यापी संपर्क कार्यालय, संभाजीनगर(औरंगाबाद) येथून प्रसिद्ध करण्यात
आलेली आहे, हीच आचारसंहिता संबंध महाराष्ट्राची असेल याची दक्षता घ्यावी.
वरील पोस्ट प्रत्येक मराठी माणसांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळे प्रत्येकाने शेअर करावे.
अधिक माहितीसाठी व पुढील नियोजनाविषयी माहिती साठी आपल्या ब्लॉग ला अवश्य भेट द्या.
http://www.shivtantra.blogspot.com
👭मोठ्या संखेने समाजासाठी एक व्हा👬
🐅एक मराठा लाख मराठा ⛳

No comments:
Post a Comment