Wednesday, May 15, 2024

विजेचा प्राथमिक परिचय (Basic Introduction of Electricity)

पदार्थ : ज्या वस्तुला वजन असते, जी वस्तू जागा व्यापते व ज्या वस्तुची ज्ञानेंद्रियास जाणीव होते त्या वस्तुला पदार्थ असे म्हणतात. घनरूप, वायुरूप आणि द्रवरूप असे तीन प्रकारचे पदार्थ असतात. उदा. लोखंड, ऑक्सिजन, पाणी इत्यादी. असे प्रत्येक पदार्थ मूलद्रव्यापासून बनलेले असतात.

मूलद्रव्ये : ज्या पदार्थाचे रासायनिक प्रक्रियेने साध्या पदार्थात अपघटन करता येत नाही. अशा पदार्थाला मूलद्रव्य म्हणतात. मूलद्रव्याचे कितीही लहान-लहान कण केले तरीही त्यांच्या अतिसूक्ष्म कणात दुसरा पदार्थ मिळत नाही. उदा: सोने, चांदी, तांबे इत्यादी.

संयुगे :- दोन किंवा दोनपेक्षा अधिक मूलद्रव्यांच्या विशिष्ट प्रमाणातील रासायनिक मिश्रणाने तयार झालेल्या पदार्थाला संयुगे असे म्हणतात. उदा-पाणी (H₂O), मीठ Nacl इत्यादी.

मिश्रण : दोन किंवा दोनपेक्षा अधिक पदार्थ रासायनिक क्रिया न होताच कोणत्याही प्रमाणात एकत्र मिसळली जाऊन तयार झालेल्या पदार्थाला मिश्रण असे म्हणतात. उदा. सागरातील पाणी. कोणताही पदार्थ हा असंख्य सूक्ष्म कणांनी बनलेला असतो. त्या सूक्ष्मकणांस अणू-

रेणू असे म्हणतात.

रेणू (मॉलीक्यूल) : मूलद्रव्यांचे अथवा संयुगाचे सर्वच्या सर्व गुणधर्म असलेल्या व स्वतंत्र अस्तित्व असलेल्या लहानात लहान कणास रेणू असे म्हणतात उदा. लोखंड, खडू, इत्यादी चा सर्वात लहान कण. अणू (अॅटम) : मूलद्रव्यांचे सर्वच्या सर्व गुणधर्म असलेल्या सूक्ष्मतम कणांस अणू असे म्हणतात. अनेक अणू पासून रेणू तयार होतो. अणू हा इतका सूक्ष्म असतो की, एका टाचणीच्या टोकावर अब्जावधी अणू सामावू शकतात. उदा. ऑक्सिजन (O₂) व हायड्रोजन (H₂) ह्यांचा रेणू त्या-त्या मूलद्रव्याच्या प्रत्येकी दोन अणूनी बनलेला असतो.

No comments:

Post a Comment

Post Labels