शिवतंत्र विचार क्रमांक १
खुन त्याचा केला...
मरणारा तर मेला
नंतर मारणाराही मेला...
पण तो दगड तिथेच पडलाय,
सांगतोय जगाला....
मी किती पराक्रम केला
दोघांचाही जीव घेतला...
सावधान...
समाजात असे काही दगड आहेत
जे आपल्याला भांडायला लावतात.
आपण एकमेकांची डोकी फोडतो.
नुकसान आपले होते.
बरबाद आपण होतो
आणि
दगड मात्र बाजूला होतात.
म्हणून शिवतंत्र सांगते
वध होण्याआधी सावध व्हा.
बरबाद होण्याआधी आबाद व्हा.
शिवरायांचे शिवतंत्र समजून घ्या
जे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी
किंवा मोठेपणा साठी
जवळची माणसे तोडतात..
असे लोक छोट्या छोटया
लुटूपुटूच्या लढाया जिंकतील
पण अंतिम युद्ध कधीच
जिंकू शकत नाहीत...
कारण घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे
बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो...
म्हणून शिवतंत्र सांगते...
जोडता नाही आले तर
जोडू नका
पण आपल्या लोकांना तोडू नका🙏🏻🚩
**********************************
**********************************
आपला ब्लॉग प्रत्येक व्यक्ति पर्यंत पोहचवा
http://www.shivtantra.blogspot.com
**********************************
**********************************
जय जिजाऊ जय शिवराय
-------धन्यवाद------


No comments:
Post a Comment