एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात, तेवढेच प्रोटॉन्सही असतात इलेक्ट्रॉन्स व प्रोटॉन्स च्या संख्या एवढाच त्या मूलद्रव्यांचा अणुक्रमांक असतो. उदा अॅल्युमिनियमचा अणुक्रमांक 13 आहे तर त्याचा अर्थ त्यांच्या अणुमध्ये इलेक्ट्रॉन्स व प्रोटॉन्स ची संख्या 13 आहे. कोणत्याही अणूतील एकूण इलेक्ट्रॉन्स हे, अणू केंद्रकाभोवती वेगवेगळ्या कक्षामध्ये सामावलेले असतात. कोणत्याही अणू केंद्रकाभोवती जास्तीत जास्त सात कक्षा असतात त्या K, L, M, N, O, P, Q ह्या अक्षराने दाखवतात. त्या कक्षामध्ये 2N² ह्या प्रमाणे इलेक्ट्रॉना सामावले जातान.
N म्हणजेच कक्षाचा क्रमांक होय.
K ह्या पहिल्या कक्षेत : 2 x 1 x 1 = 2 इलेक्ट्रॉन्स.
L ह्या दुसऱ्या कक्षेत : 2 x 2 x 2 = 8 इलेक्ट्रॉन्स,
M ह्या तिसऱ्या कक्षेत : 2x3x3 = 18 इलेक्ट्रॉन्स,
Q ह्या कक्षेत : 2 x 7x7 = 98 इलेक्ट्रॉन्स.
ह्या प्रमाणे इलेक्ट्रॉन्स सामावले जातात. परंतु प्रत्येक अणुतील सर्व कक्षा पूर्ण भरलेल्या असतातच असे नाही, सामान्यतः पहिल्या अठरा क्रमांकाच्या मूलद्रव्यांच्या बाबत वरील प्रमाणे विभागणी होत असते.